प्रकरण |
विभाग 1 |
विभाग 2 |
| नवे घटक, दुसरीकडे स्थापन केलेल्या किंवा बंद केलेल्या घटकाच्या बदल्यातील घटक |
अ) अनुसूची 1 उद्योगासाठी मुक्तपणे अनुमति दिली जाईल. |
अ) अनुसूची 2 मधील घटकांच्या ऐवजी मुक्तपणे अनुमति दिली जाईल. |
| ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची -1 ए प्रमाणे अनुमति दिली जाईल. |
ब) केवळ एमआयडीसी क्षेत्रातील अनुसूची 2 मधील उद्योगांना अनुमति दिली जाईल. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 9 अंतर्गत दिलेल्या समितीच्या अनुमति नंतर परवानगी दिली जाईल. |
| (क) इतरांना परवानगी दिली जाणार नाही. |
(क) उरण उप क्षेत्रामध्ये अनुसूची 3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही नविन / बदलीच्या घटकाला परवानगी दिली जाणार नाही. |
2. विस्तारीकरण, फेरबदल किंवा वर्तमान घटकाचे रुपांतरण |
(अ) अनुसूची 1 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. |
(अ)अनुसूची 2 मधील उद्योगांशिवाय विस्तारीकरण आदीना परवानगी दिली जाईल. |
| ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे अनुमति दिली जाईल. |
ब) केवळ एमआयडीसी क्षेत्रातील अनुसूची 2 मधील उद्योगांना अनुमति दिली जाईल. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 9 अंतर्गत दिलेल्या समितीच्या अनुमति नंतर परवानगी दिली जाईल. |
| क) अतिरिक्त वीजेची आवश्यकता नसलेल्या व अतिरिक्त बांधकाम क्षेत्र नसलेल्या कारखान्यांना प्रदूषणाचा स्त्रोत संपूर्णतपणे कमी करण्याच्या अटीवर अनुसूची 2 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. |
|
| ड) अनुसूची 1, 1ए व 2 मध्ये समाविष्ट नसलेल्या घटकांना एफएसआय मान्यतेनुसार, 4 /5 / 93 रोजी अतिरिक्त विजेचा अधिकृत जोडणी भार 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या अटीं वर परवानगी दिली जाईल. |
|
| 3. खुल्या जागेवर प्रस्तावित औद्योगीक वसाहतीचे बांधकाम |
अ) गृहनिर्माण साठी अनुसूची 1 उद्योगांसाठी परवानगी दिली जाईल. |
अ) गृहनिर्माण साठी अनुसूची 2 व्यतिरिक्त उद्योगांना परवानगी दिली जाईल. |
| ब) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे परवानगी दिली जाईल. |
ब) एमआयडीसी क्षेत्रातील गृहनिर्माण साठी अनुसूची 2 मधील उद्योगांना परवानगी दिली जाईल. |
| क) वरील (अ) व (ब) व्यतिरिक्त गृहनिर्माणासाठी परवानगी दिली जाणार नाही. |
|
| 4. मान्यता प्राप्त औद्योगीक वसाहती/विभागाच्या गाळ्यांचे विस्तारीकरण (अंतिम ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या) |
अ) या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 मध्ये दिलेल्या अटींच्या अधिन ठाणे महापालिका क्षेत्र व मिरा भाईंदर नगर परिषद क्षेत्रातील उद्योगांना अनुसूची - 1 ए प्रमाणे गृहनिर्माणास परवानगी दिली जाईल. |
अ) अनुसूची 2 च्या उद्योगा अतिरिक्त गृहनिर्माणासाठी परवानगी दिली जाईल. |
|
ब) एमआयडीसी क्षेत्रामध्ये विस्तारीकरण / विभागासाठी परवानगी दिली जाईल, गृहनिर्माण अनुसूची 2 मधील उद्योगासाठी सुद्धा. |