To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
     आमच्या विषयी-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना
महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, 1969, च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 च्या तरतुदींनुसार दिनांक 1.6.1981 रोजी महाराष्ट्रामध्ये जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 महाराष्ट्रामध्ये 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक २.५.१९८३ रोजी घोषित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक ६.११.१९९६ पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.

जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 च्या तरतुदीमध्ये सांगीतल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.



 
 
 
 
 
 
This webpage is last modified on Wednesday, September 18, 2019 07:53:03 UTC
Go to top
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022